Saturday, July 21, 2007

फ़णस

मन आणि बुद्धी यांचे द्वन्द्व माणसाला घडवते, चांगल नाही तर वाईट, प्रेमळ नाही तर भावनाशुन्य, अव्यवहारी नाही तर अतिव्यवहारी अगदी पाषाण नाही तर लोणी, स्वत:च्या नजरेत आणि दुसऱ्यांच्या ही. ह्यांचे भांडण रोजच चालु असते, कधी छोटे कधी मोठे, कधी ते चटकन सहमत होतात तर कधी दिवस मागुन दिवस रात्री मागुन रात्री त्यांची झटपट चालु असते.

ह्या मनाच कारभारच जगाचा कारभार चालवतो. अगदी बाजारातुन एखादी गोष्ट विकत घेण्यापासुन ते राष्ट्रपति निवडण्यापर्यत. घरी बायको बरोबरचे डिल असो की ऑफ़िस मधले, निर्णय हे द्वन्द्वच घेते.

या रस्साखेचित जर तुम्हाल सुवर्णमध्य साधायचा असेल तर नुसते प्रेक्षक बनुन, निर्णय ऐकुन चालनार नाही, referee बनुन रिंगनात ऊतरावे लागेल आणि परिस्थिती नुसार मन किंवा बुद्धिला विजयी करावे लागेल.

हे दिसते तितके सोपे नाही, पण तुम्हाला जर फ़णस व्हायचे असेल तर या शिवाय दुसरा पर्याय नाही.

Sunday, July 1, 2007

मी मैत्री चोरली

माणुस चोर कसा बनतो ह्याचे "प्रयोगासह सिद्ध करा" मी नुकतच अनुभवलं.
थोर लोक म्हणुन गेलीत कि माणसाला दोन गोष्टीची भूक असते मनाची आणि पोटाची,
९ ते ५ मुळे पोटाची खळगी तर भरती आहे पण मनाचा साठा केंव्हाच संपला.
आणि त्यातच अर्धांगीनी आणि पुत्ररत्न (practice व्हावी म्हनुन मुद्दाम अवघड शब्द निवडलेत) मायदेशी गेल्याने माझ्या एकटेपणाला ऊतु आलय.

अश्या या सैर-भैर मनस्थितित Orkut चा समुद्र सापडला आणि मी त्यात माझ्या एकलेपणाची एकली नाव घेऊन मित्र, मित्रांचे मित्रा, मित्रांच्या मित्रांचे मित्र आणि त्यापलीकडेही सफ़री केल्या. या चमत्कारीक प्रवासात कधी ५० लोकांचे बेट कधी १०० लोकांचे बेट तर कधी अगदी २ लोकांचे बेट ही सापड्ले आणि मी गुपचुप (thats a setting in Orkut ! ) त्यांच्या या मायावी दुनियेत सामिल होऊ लागलो.
या स्वैर भटकंतीत अनेक घटना अनेक विधान अनेक लुटुपुटुचे भांडने आणि अनेक कवितांच आस्वाद घेतला.

त्यातली एक चोरुन आणली तुम्हा सर्वांसाठी

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!